कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाचा वेग आणखी वाढवला

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाचा वेग आणखी वाढवला

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवला आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून सकाळी ८ वाजेपर्यंत १ लाख १७ हजार ४२८ क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र हा विसर्ग वाढवून २ लाख क्यूसेक करण्यात आला आहे. अलमट्टी धरणाचे २६ दरवाजे सकाळी १० वाजता उघडण्यात आलेत. या दरवाज्यातून तब्बल १ लाख ५७ हजार ५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून देखील ४२ हजार ५०० क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. पूर परिस्थितीबाबत मागील महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारमध्ये संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली होती. या बैठकीचे सकारात्मक प्रतिसाद आता दिसून येतायत.

राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णानदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होऊन पुराचा धोका वाढला. त्याचप्रमाणे सांगली सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. २०१९ सारखा पूराचा फटका पुन्हा सांगली जिल्ह्याला बसणार नाही यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.


हेही वाचा – महापूराने वेढलेल्या चिपळूणच्या कोविड रुग्णालयात ८ जणांचा मृत्यू

First Published on: July 23, 2021 3:32 PM
Exit mobile version