कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अशी जोरदार मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कर्नाटक सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. ’महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे.” “हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केले हा कोर्टाचा अपमान नाही का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की “एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे.

“मराठी एकीकरण समिती तुटली कशी? मराठीदुहीचा शाप आहे. अनुभवाचे फटके पडले आता मराठी अस्मिता एकत्र आणत नाही, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. संघराज्याचे स्वप्न आहे.

भाषावार प्रांतरचना झाली पण महाराष्ट्रातील मराठी माणसे आपल्यापासून दूर केली. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणार. मराठी आमदार निवडून आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.मराठी महापौर निवडून आले, पण त्यांनी काही केले तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह? आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका. जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

First Published on: January 28, 2021 6:00 AM
Exit mobile version