लसीकरणानंतर विभागीय आयुक्त गमे कोरोना पॉझिटिव्ह

लसीकरणानंतर विभागीय आयुक्त गमे कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनावर लस आल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडलेला असतांना आता प्रशासकिय अधिकारयांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने चिंता वाढली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. सरकारमधील मंत्रीही आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणराज्यमंत्री बच्चु कडु यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात प्रशासकिय अधिकार्‍यांनाही लस देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही दोनच दिवसांपूर्वी १७ फेब्रुवारी रोजी लस घेतली मात्र दोनच दिवसांत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील विविध जिल्हयात अधिकार्‍यांनी लस घेतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने लसीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित केली जाउ लागली आहे.

First Published on: February 19, 2021 1:32 PM
Exit mobile version