‘मराठा आरक्षणाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र या’

‘मराठा आरक्षणाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र या’

फोटो सौजन्य -DNA

आरक्षणावरून संतप्त झालेल्या मराठा समाजाने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. बंदला राज्यातील काही भागांमध्ये गालबोट देखील लागले. यावेळी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने काही ठिकाणी गाड्या देखील पेटवल्या. मराठा समाजाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेत मराठीमध्ये निवेदन सादर केले. यावेळी बोलताना महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरीत मार्गी लावा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेत केली. छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यामध्ये मराठा समाजाचा देखील समावेश होता. ‘स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिल्याने समाजाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे’.

मराठा समाजाचे ५६ मुक मोर्चे

आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक होत समाजाने राज्यभरात ५६ मुक मोर्चे काढले होते. या मोर्चांची दखल जगाने घेतली होती असे देखीस संभाजी राजे यांनी म्हटले. त्यामुळे ‘आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कुणीही राजकारण न करता एकत्रित येऊन मराठा समाजाच्या मागण्या ऐकून घ्याव्यात. शिवाय त्यांचे प्रश्न देखील मार्गी लावावे’ असे संभाजी राजे यांनी म्हटले आहे.

खासदार खैरेंना धक्काबुक्की

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई, पुणे, सातारा आणि सोलापूर वगळता राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोमावारी आंदोलनावेळी गोदावरी नदी पात्रामध्ये उडी मारुन जीवन संपवणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्यावर आज कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आले असता आंदोलकांनी गोंधळ घालत खैरेंना धक्काबुक्की केली. दरम्यान खैरे काहीच न बोलता घटना स्थळावरुन निघून गेले.

आरक्षणाच्या मागणीसाठी घेतली जलसमाधी

सोमवारी औरंगाबादच्या गोदावरी नदी पुलावरुन आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीपात्रामध्ये जलसमाधी घेतली. त्याला नदी पात्रातून बाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी रास्तारोका, जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक करण्यात येत आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करुन लेखी आश्वासन दिल्यानंतरच आज आंदोलकांनी काकासाहेब याचा मृतदेह स्विकारला.

 

वाचा – मराठा आंदोलन चिघळले; खा. चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की

First Published on: July 24, 2018 4:18 PM
Exit mobile version