करोनाच्या भीतीने रक्तदान करण्यास घाबरू नये

करोनाच्या भीतीने रक्तदान करण्यास घाबरू नये

रक्तदान मोहिमेसाठी आता फेसबुकचा वापर

सध्या देशात करोनामुळे भीती आणि दहशत पसरली आहे. पण, करोनाच्या भीतीने रक्तदान करण्यास घाबरु नये, असं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवाहन केलं आहे. महाराष्ट्र शासन जनसामान्यांमध्ये याबाबत जागृती करून या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. पण, दरवर्षी एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे तसंच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासतो. यामध्येच रक्तदात्यांमध्येही रक्तदानाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पण, नागरिकांनी रक्तदानाविषयी भिती न बाळगता पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे

सध्या करोना व्हायरसमुळे रक्तदान कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे याबाबत परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रात दर दिवशी साधारणपणे ४ ते ५ हजार रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारादरम्यान शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासते. ही गोष्ट लक्षात घेऊन रक्तदात्यांची करोनाबाबतची लक्षणे तसेच प्रवासाचा इतिहास तपासून आणि गर्दीचे नियमन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या आहेत. याबाबतचे परिपत्रकच जारी करण्यात आले आहे.

रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत गरजेचे

या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, रक्ताला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे, सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावी. तसेच, रक्तदात्यांनी गरजू रूग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचवण्यास मदत करावी. रक्तदाते त्यांच्या जवळ असलेल्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करू शकतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि गर्दी करू नये हे जरी खरे असले तरी रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण, सद्यस्थितीत रक्ताला कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे करोना विषाणूची लागण होत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. करोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवा. करोनाच्या लढाईसोबत रक्तदानाचे आवाहन स्विकारुया. त्यामुळे, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता रक्तदान करण्यासाठी नागरिकांना पुढाकार घ्यावा, असं आवाहन परिषदेने केले आहे.


हेही वाचा – करोनाची धास्ती; सरकारी कार्यालयाची उपस्थिती ५०-५० टक्क्यांवर आणणार – मुख्यमंत्री


 

First Published on: March 17, 2020 8:58 PM
Exit mobile version