गुलामीच्या पाऊलखुणा संपवल्या, नामांतराला धार्मिक रंग नको; उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

गुलामीच्या पाऊलखुणा संपवल्या, नामांतराला धार्मिक रंग नको; उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था ।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।, असं म्हणत आम्ही औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर केलं आहे. यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर म्हणून ओळखलं जाईल. मात्र, याला कोणीही धार्मिक रंग देऊ नये. जगाच्या पाठीवर कोणीच गुलामीच्या खुणा ठेवत नाही, आक्रत्याचा पुरस्कार, सत्कार होत कोणीच करत नाही, असं राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वाढिदवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Don’t give religious effect on rename of city says devendra fadnavis)

हेही वाचा – शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

आक्रमणाचा पाऊलखुणा घालवण्याचं काम सर्वच देश करतात. गुलमीच्या पाऊलखुणा आम्ही संपवतोय आणि स्वराज्याची सुरुवात झाली आहे हे भासवणारं नाव आम्ही ठेवत आहोत, त्यामुळे याप्रकरणाला धार्मिक रंग देण चुकीचं आहे. महाराष्ट्र सौभाग्यशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याला स्वतःचाच विचार करायला शिकवलं नाही तर संपूर्ण भारताचा विचारा करायला शिकवलं. देशाच्या मागे नेहमीच महाराष्ट्र उभा राहिला. हीच महाराष्ट्राची संस्कृती, हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय, फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

घटकपक्षांना स्थान देणार

हे सरकार फक्त शिवसेना-भाजपचं सरकार नाही. तर, घटकपक्षातील सर्वंच पक्षाचे सरकार आहे. शिवसंग्रामसहीत जेवढे घटकपक्ष आहेत, त्या सर्वांना वाटा देण्याचा प्रयत्न करणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: July 16, 2022 3:19 PM
Exit mobile version