डॉ. श्रीराम लागू यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. श्रीराम लागू यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. श्रीराम लागू

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ‘नटसम्राट’अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले असून आज त्यांच्यावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई हे सकाळी ११.१५ वाजता डॉ. लागू यांच्या अंत्यविधीस वैकुंठ स्मशानभूमी येथे उपस्थित राहणार आहेत.

लागू यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आज सकाळी ९ वाजता डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिव रुग्णालयातील शवगृहातील कर्वेनगर येथील राहत्या घरी नेण्यात येणार असून त्याठिकाणी नातेवाईकांना पाऊण तास अंतिम दर्शन घेता येणार आहे. सकाळी १० वाजता डॉ. लागू यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरात ठेवले जाणार असून एक तास सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता डॉ. लागू यांची अंत्ययात्रा बालगंधर्वपासून निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. तर साधारपणे दुपारी १२. १५ च्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

First Published on: December 20, 2019 9:06 AM
Exit mobile version