डॉ. तात्याराव लहाने पुन्हा एक्शन मोडमध्ये

डॉ. तात्याराव लहाने पुन्हा एक्शन मोडमध्ये

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकपदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ तात्याराव लहाने पुन्हा एकदा जे जे रूग्णालयात कार्यरत झाले आहेत. गेल्या ३६ वर्षांपासूनचे जे जे हॉस्पिटलच्या नेत्र विभागातील व्रत त्यांनी पुन्हा एकदा सुरू केले आहे. राज्य सरकारने जे जे रूग्णालयाच्या नेत्रविकार विभागात प्राध्यापक म्हणून नेमणुक केली आहे. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने हे पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आपल्या ३६ वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत दीड लाखांहून अधिक नेत्र रूग्णांवर डॉ लहाने यांनी शस्त्रक्रिया केली आहे.

५० लाख शस्त्रक्रिया 

सेवा निवृत्तीच्या वेळीच डॉ लहाने यांनी हे नेत्र सेवेचे व्रत अखंडीतपणे सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली होती. आता जे जे रूग्णालयात पुन्हा एकदा नेमणुक झाल्यानंतर डॉ लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या संधीमुळे डॉ लहाने पुन्हा एकदा नेत्र सेवा करताना दिसणार आहेत. डॉ लहाने यांनी याआधी ३६ वर्षे नेत्र विभागात जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात एकुण ४ लाख नेत्र रूग्णांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. तर नेत्र विभागात आतापर्यंत पार पडलेल्या शस्त्रक्रियांची संख्या ५० लाख इतकी आहे. डॉ लहाने यांनी स्वतः १ लाख ६२ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचसोबतच राणे यांनी आतापर्यंत ६६७ शिबिरातून ३० लाख रूग्णांवर उपचार केले आहेत. १८० पेक्षा अधिक शिबिरांमध्ये शस्त्रक्रिया करत त्यांनी रूग्णांना दृष्टी मिळवून देण्याची किमया केली आहे.

36 वर्षांचे अखंडीत नेत्र रूग्णसेवेचे व्रत 

डॉ लहाने यांनी ३६ वर्षांच्या कालावधीत जे जे हॉस्पिटलमधील नेत्रविकार विभागात अनेक मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यामध्ये अत्याधुनिक सामुग्रीने विभाग सज्ज करण्यात डॉ लहाने यांचा वाटा आहे. डॉ लहाने रूजू होण्याआधी वर्षाला ६०० शस्त्रक्रिया होत होत्या. पण डॉ लहाने यांनी रूजू झाल्यापासून वर्षाला २० हजार शस्त्रक्रिया होऊ लागल्या. अनेक दुर्गम भागात, आदिवासी पाड्यात डॉ लहाने यांनी आपल्या ३६ वर्षांच्या कालावधीत अखंडीतपणे नेत्र सेवेचे व्रत सुरू ठेवले. परिणामी अनेकांना पुन्हा एकदा दृष्टी मिळणे शक्य झाले.


 

First Published on: August 19, 2021 2:28 PM
Exit mobile version