विनायक मेटेंच्या चालकाचा मोठा खुलासा, ‘त्या’ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

विनायक मेटेंच्या चालकाचा मोठा खुलासा, ‘त्या’ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

बीड – शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचे मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेटेंच्या अपघातापूर्वी 3 ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवेवर शिक्रापूरजवळ एका गाडीने पाठलाग केला होता. याबाबत मेटे यांच्या चालकाने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.

कार्यकर्त्यांचा आरोप –

मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला हे अजून समोर आलेले नाही. दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी काही आरोप केले आहे, त्यामुळे मेटे यांचा अपघात आहे की घातपात याची चर्चा रंगली आहे. तर आता मेटेंचा चालक समाधान वाघमारे यांनी वेगळाच खुलासा केला आहे.

त्या दिवशी काय घडले –

3 ऑगस्ट दिवशी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. आमची गाडी ही 80 च्या स्पीडने चालली होती. पण त्या गाडीने जवळपास 120 किमीच्या वेगाने कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले, ते पिलेले असतील त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त 80 च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता.

 पाठीमागच्या एअरबॅग उघडल्या का नाहीत –

मी सुट्टीवर होतो, मी असतो तर हा अपघात झालाच नसता. मी दीड-दीड हजार किलोमीटर गाडी चालवायचो. पण कधीही झोपलो नाही. झोप आली तर तसे सांगायचो. मी सीट बेल्ट नेहमी वापरतो. 2007 पासून मी मुंबईत गाडी चालवत होतो. गाडीचा अपघात झाला, त्यावेळी दोनच एअरबॅग बाहेर निघाल्या आहेत, पाठीमागच्या एअरबॅग उघडल्या का नाही, याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे, असे वाघमारे म्हणाले.

First Published on: August 17, 2022 3:35 PM
Exit mobile version