drugs case : मलिकांचा जावई समीर खानच्या अडचणी वाढणार, NCBची हायकोर्टात याचिका

drugs case : मलिकांचा जावई समीर खानच्या अडचणी वाढणार, NCBची हायकोर्टात याचिका

राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानच्या अडचणीत वाढ होणार आहे. मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपानंतर हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. नुकतेच मलिकांचा जावई समीर खानला ड्रग्ज प्रकरणात सेशन कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. समीर वानखेडेला बनावट प्रकरणात अडकवण्यात आले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर खानला २०० किलो गांजा प्रकरणात अटक करण्यात आले होते परंतु समीर खानकडे कोणताही गांजा सापडला नसून हर्बल तंबाखूला गांजा सांगण्यात आले असल्याची अहवालात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले होती. मलिक यांनी आरोप केला आहे की, जावई समीर खानला बनावट प्रकरणात अटक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्या नंबरवरुन सर्व माध्यमांना समीर खानकडे २०० किलो गांजा सापडल्याचे सांगितले असल्याचे नवाब मलिकांनी आरोप केला आहे. तसेच समीर खानकडे हर्बल तांबाखू होता त्याला गांजा दाखवण्यात आले आहे. एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखूमधला फरक कळतो की नाही असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने बोलणं योग्य नाही

दरम्यान नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांना जे काही करायचे आहे ती त्यांची इच्छा, प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे. तर एनसीबीने नवाब मलिकांच्या जावयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

मलिकांच्या जावयाला ८ महिन्यानंतर निर्दोष मुक्तता

समीर खानच्या जामीनाचा न्यायालयीन लेखी आदेश न्यायधीशांकडून प्राप्त झाले नव्हते ते काल सकाळी ११ वाजता कोर्टाच्या पोर्टलवर जस्टीस जोगळेंची ऑर्डर लोड झाली. न्यायाधीश जोगळेंची ऑर्डर आल्यानंतर वाचण्यात आली. माझ्या जावयाला ८ महिने कोठडीत राहावं लागले आता निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. परंतु त्याची पत्नी वेगळ्या मानसिक परिस्थितीमध्ये होती. त्यांचे २ मुले आहेत त्यांच्यावरही परिणाम झाला आहे. ते भेटण्यासाठीही तयार नाही. घरातील काही लोकांना सोडल्यास कोणाला भेटत नाही अशी परिस्थिती असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला


 

First Published on: October 14, 2021 2:30 PM
Exit mobile version