धक्कादायक! रुग्णांच्या किंकाळ्या आणि अस्वस्थ करणारी दृश्य; गोदावरी मेडिकलमधील प्रकार

धक्कादायक! रुग्णांच्या किंकाळ्या आणि अस्वस्थ करणारी दृश्य; गोदावरी मेडिकलमधील प्रकार

रुग्णांच्या किंकाळ्या आणि अस्वस्थ करणारी दृश्य

चाळीसगाव येथील शैलजा रुग्णालय येथे उपचार सुरु असलेल्या रुग्णाला जळगावच्या गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुग्णाला घेऊन त्यांचे कुटुंब गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतेही सहकार्य न करता त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे गुडघाभर पाण्यात रुग्णासह नातेवाईकांचे प्रचंड हाल झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले.

नेमके काय घडले?

चाळीसगाव येथे राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बहिणीची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना शैलजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालवल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णासह नातेवाईकांना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पाठविले. मात्र, रुग्णाला उपचारा करता दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे भर पावसात रुग्णासह नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. एकीकडे रात्रीचा काळाकुट्ट अंधार, आजूबाजुला भटकंती करणारे साप आणि वेदना होणाऱ्या रुग्णांच्या किंकाळ्या याने संपूर्ण वॉर्डात एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे या नरकयातना रुग्णांसह कुटुंबाना सहन कराव्या लागत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.


हेही वाचा – पळून जाण्याच्या संशयावरून पतीने केला झोपेत पत्नीचा खून; आईच्या कुशीत झोपलेली चिमुकली जखमी


First Published on: June 14, 2020 1:14 PM
Exit mobile version