‘दसरा मेळावा स्वाभिमानाचा’, सभेच्या काही तास आधी शिंदे गटाचा नवा टीझर

‘दसरा मेळावा स्वाभिमानाचा’, सभेच्या काही तास आधी शिंदे गटाचा नवा टीझर

महाराष्ट्रातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या दसरा मेळाव्यासाठी मंच सजले आहेत. कार्यकर्तांची फौज दाखल झाली आहे. अखेर दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागूण आहे. दोन्ही गटाच्या दसऱ्या मेळाव्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. इथे मैदानातील लढाई अतितटीची होताना सोशल मीडियावरही दोन्ही गटांने ऑलाईन प्रमोशनाची जोरदार लढाई सुरु केली आहे. यात मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेचा नवा टीझर पोस्ट केला आहे. दसरा मेळावा स्वाभिमानाचा या टॅगलाईनसह हा टीझर ट्विटवर शेअर केला आहे. या टीझरच्या माध्यमातूनही निर्णय विकासाचा, निर्णय हिंदुत्वाचा, निर्णय मराठीच्या अभिमानाचा असल्याचे दाखवत त्यांनी आपली बंडखोरी का योग्य होती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपला मेळावा शिवसेनेचा असल्याचे त्याच नमूद केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवर टीझर ट्विट करत लिहिले की, ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची, हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी. मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. #चला_BKC

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना आणि त्याचे अधिकृत निशाणी धनुष्यबाण आपल असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेनाचं आपली असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून केल जात आहे. यामुळे शिंदे गटानेही आपला दसरा मेळावाही भव्यदिव्य करण्यासाठी कंबर कसली आहे.


नाना पटोलेंसह तुमच्या लोकांना सल्ले द्या; फडणवीसांचा शरद पवारांना टोला


First Published on: October 5, 2022 12:26 PM
Exit mobile version