Duststorm Update : मध्य प्रदेशासह राजस्थानमध्ये उद्या धुळीचे वादळ होण्याची शक्यता

Duststorm Update : मध्य प्रदेशासह राजस्थानमध्ये उद्या धुळीचे वादळ होण्याची शक्यता

मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) उद्या राजस्थानमध्ये धुळीचे वादळ (Duststorm Update)  तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आज पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेशात पावसाचा वेग कमी होईल आणि उद्यापासून घट होईल, असं देखील हवामान खात्याने (IMD) वर्तवलं आहे. परंतु पश्चिम राजस्थानमधील काही ठिकाणी धुळीचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबला आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल होण्याचा अंदाज बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सून २७ जून रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र हा अंदाज आता बदलण्याची शक्यता आहे.

राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर भंडारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. तसेच वर्ध्यातही पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच नवी मुंबईतही पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.

नवी मुंबईतील अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पहाटे दरम्यान पाऊस पडला होता. आज पुन्हा एकदा शहरात पाऊस झाला होता. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. वर्धा शहरातही दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तब्बल वीस मिनिटं झालेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला.

आगामी दोन दिवसात मान्सून हा केरळमध्ये धडकणार असून त्याचा प्रवास तळकोकणाकडे सुरु होणार आहे. ५ जूनच्या सुमारास मान्सून तळकोकणात बघायला मिळेल आणि मग ७ जुनच्या सुमारास तो राजधानी मुंबईत दाखल होणार आहे. म्हणजेच मान्सून हा दोन दिवस उशिरा कोकणात दाखल होणार आहे.


हेही वाचा : Monsoon Update : मुंबईसह कोकणात रिमझिम पावसाला सुरुवात: संपूर्ण भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून


 

First Published on: May 24, 2022 10:11 PM
Exit mobile version