Maharashtra Band: अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, शिवसेनेचे सामना मधून आवाहन

Maharashtra Band: अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, शिवसेनेचे सामना मधून आवाहन

Maharashtra Band: अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा, शिवसेनेचे सामना मधून आवाहन

उत्तर प्रदेश लखीमपूर (Lakihmpur Vilolence)  येथे झालेल्या क्रूर हिंसाचाराविरोधात आज राज्यात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band)  हाक दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेने सामना अग्रलेखातून केले आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेने सामना अग्रलेखातून केले आहे.

इतर राज्यांनी ‘महाराष्ट्र बंद’चे अनुकरण करावे

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यांच्या निर्घृण हत्येचा साधा निषेध देखील मोदी सरकारने केला नाही. तर शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात देशात संतापाची लाट आहे. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करुन देण्यासाठी, शेतकऱ्यांनी सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. इतर राज्यांनी देखील महाराष्ट्र बंदचे अनुकरण करावे असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

शेतकरी देशाचा आत्मा,तो संपवण्याचा प्रयत्न

‘जय जवान जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणत सामना अग्रलेखातून केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे . दोन वर्षांपासून गाझीपूरच्या बॉर्डवर शेतकरी ऊन, वारा,पावसाची पर्वा न करता आंदोलन करत असून या काळात चारशेहून अधिक आंदोलक शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खोरीची भंयकर घटना असल्याचे सामना अग्रलेखात म्हटले आहे.


हेही वाचा – Maharashtra band: मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा, दुकाने ४ वाजेपर्यंत बंद राहणार

First Published on: October 11, 2021 8:50 AM
Exit mobile version