Maharashtra band: मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा, दुकाने ४ वाजेपर्यंत बंद राहणार

महाराष्ट्र बंदला मुंबई, पुणे, नाशिकच्या कृषी समित्यांचा पाठिंबा

Mumbai and Pune Merchants to support 'Maharashtra Band,Shops will be closed till 4 p.m.
Maharashtra band: मुंबई पुण्यातील व्यापाऱ्यांचा 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा, दुकाने ४ वाजेपर्यंत बंद राहणार

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी ( Lakihmpur Vilolence )  येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Band) पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदला राज्यातील काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई, पुण्यासह नाशिकमध्ये व्यापारांच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिलाय तर काही संघटनांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व कार्यकर्ते सकाळी १०.३० वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे उपस्थित राहणार असून लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी होणार आहेत.


मुंबईतील दुकाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा देणार आहेत. तर पुणे व्यापारी महासंघाने देखील महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि किसान सभेने बंदला पाठिंबा दिलाय. आजच्या महाराष्ट्र बंदला एसटी महामंडळाची सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबईतील दादार मार्केट देखील बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतील एपीएससी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. एपीएमसी मार्केट आज पूर्णपणे बंद राहणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला मुंबई, पुणे, नाशिकच्या कृषी समित्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दूध, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर वाहने सुरू राहणार का हा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. मुंबई तसेच पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे डबेवाल्यांनी देखील आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे.

काय बंद राहणार?

हॉस्पिटल,मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका,दूध पुरवठा इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरुळीत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक सांगितले. त्याचप्रमाणे दुकानदारांनी स्वता:हून महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्या असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकाने आणि काम बंद ठेवावे असे नवाब मलिक यांनी म्हणाले.


हेही वाचा – आज महाराष्ट्र बंद: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची जोरदार तयारी; मनसे, भाजपसह व्यापार्‍यांचा बंदला विरोध