इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेचे विजेते घोषित; जाणून घ्या

इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेचे विजेते घोषित; जाणून घ्या

eco friendly bappa contest

मुंबई : समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि विविध विषयांप्रति समाजप्रबोधन व्हावे याकरिता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यांच्या प्रबोधनाचा वारसा आजही जपला जातोय. सण साजरे होताना पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता ‘दैनिक आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर’ यांनी संयुक्तरीत्या इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. या स्पर्धेसाठी यंदा दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी निवडक इको फ्रेंडली बाप्पांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यापैकी तीन स्पर्धकांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.

कोल्हापूर करवीर निवासी श्री महालक्ष्मी देखावा सादर करणारे राजेश रमेश घार्गे यांना प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात येत आहे. इको फ्रेंडली सजावट करणारे सौरभ हळदवणेकर यांना दुसऱ्या क्रमांकाचे विजेते म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर पाणी हेच जीवन या विषयावर सतीश पवार यांनी केलेल्या सजावटीला तिसऱ्या क्रमाकांचे विजेते म्हणून घोषित करत आहोत.

प्रथम विजेता
राजेश रमेश घार्गे, ठाणे

द्वितीय विजेता
सौरभ हळदवणेकर, नालासोपारा

तृतीय विजेता
सतीश शिवाजी पवार, मुंबई

विजेत्या स्पर्धकांनी २० ऑक्टोबरपर्यंत आपलं महानगरच्या कार्यालयात येऊन पारितोषिक घेऊन जावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विजेत्यांनी येताना आपले सरकारमान्य ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्स किंवा मतदान ओळखपत्र आदी) घेऊन येणे अनिवार्य आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


हेही वाचाः बाबो! अनिल परबांचा ६ कोटींचा रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीचा खर्च

First Published on: October 12, 2022 8:01 PM
Exit mobile version