Gauri ganpati 2023 : कधी आहे गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Gauri ganpati 2023 : कधी आहे गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन? जाणून घ्या शुभ मुहूर्त

19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसांडून वाहत आहे. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरलेलं आहे. आता अशातच गौराईंच्या येण्याची देखील अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल. या दिवशी गौराईचा साज श्रृंगार केला जाईल. विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन देखील म्हटले जाते. गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जाईल. तर गौरी पूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखला जाईल. काही ठिकाणी विविध प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे.

गौरीला पार्वतीचे रूप मानले जाते आणि गणपती बाप्पाची ती आई आहे. त्यामुळे तिच्या घरी येण्याची सर्वांनाच ओढ लागलेली असते. यंदा गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल. तर शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. शनिवारी, 23 सप्टेंबर रोजी विसर्जन असेल. त्यामुळे ज्यांच्या घरी 5 दिवसांचा बाप्पा आहे. त्यांचे विसर्जन देखील गौरीसोबतच होणार आहे.

गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त

 


हेही वाचा :

Rishi Panchami 2023 : आज ऋषिपंचमी; जाणून घ्या व्रत आणि कथा

First Published on: September 20, 2023 3:15 PM
Exit mobile version