संजय राऊतांच्या घरातून साडे अकरा लाखांची रोकड जप्त

संजय राऊतांच्या घरातून साडे अकरा लाखांची रोकड जप्त

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरी नऊ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेले. संजय राऊतांच्या घरी केलेल्या चौकशीत काय मिळाले, असा सवाल वारंवार विचारण्यात येत होता. त्यावर मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केल्याचे समजते. (Ed Officials Seized 11 And Half Lakh Rupees From Shiv Sena mp Sanjay Raut Home In Raid)

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ७ वाजेपासून राऊतांच्या ‘मैत्री’ या बंगल्यावर सात तास चौकशी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घराची छाननी केली. तसेच या कारवाईत ईडीने काही कागदपत्रे तपासली. यातील महत्त्वाची कागदपत्रे ईडीचे अधिकारी आपल्या सोबत घेऊन गेले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतले असून, राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द राऊत यांनीच दिलेले आहेत. “मी स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी चाललो आहे”, असे म्हणाले होते.

दरम्यान, याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर टीका केली. “माफिया पोलीस कमिश्नर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार ना”, असा नवा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. किरीट सोमय्या हे काही महिन्यांपासून सातत्याने संजय राऊतांचा पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. तसेच, संजय राऊतांवर आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल करत होते. त्यानुसार, पुन्हा एकदा ईडीने राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नवा आरोप करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा – “दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार”; ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला

First Published on: July 31, 2022 11:28 PM
Exit mobile version