रणजितसिंह डिसले गुरुजींच्या कार्यकर्तृत्वावर आक्षेप, शिक्षण अधिकारी लोहार यांचे गंभीर आरोप

रणजितसिंह डिसले गुरुजींच्या कार्यकर्तृत्वावर आक्षेप, शिक्षण अधिकारी लोहार यांचे गंभीर आरोप

ज्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि ज्यांची जगाने दखल घेतली ते रणजितसिंह डिसले गुरुजी सध्या नाराज आहेत. डिसले गुरुजींना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली आहे. परंतु रणजितसिंह डिसले गुरुजींच्या कार्यकर्तृत्वावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डिसले गुरुजी शाळेकडे फिरकले नाही. डिसले गुरुजींनी दीड महिन्यांपूर्वी आपला रजेचा अर्ज केला होता परंतु त्या अर्जात त्रुटी असल्याचे ते मंजूर करण्यात आला नाही.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकेची स्कॉलरशीप जाहीर झाली आहे. या स्कॉलरशीपसाठी डिसले गुरुजी यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना डिसले गुरुजी यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जात काही त्रुटी असल्याने अर्ज मंजूर करण्यात आला नाही. अर्ज मंजूर करण्यात आला नसल्याचे कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. डिसले गुरुजी यांच्या विरोधातील मागील तीन वर्षांचा अहवाल सादर झाला आहे.

डिसले गुरुजी गेल्या ३ वर्षांपासून शाळेकडे आले नाही. चौकशी अहवाल आला असून डिसले गुरुजी परदेशात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कसं शिकवणार? आधी शाळेच्या मुलांना शिकवायला हवे? डिसले गुरुजींना शाळेसाठी काही प्रयत्न केले असे काही दिसले नसल्याचा आरोप प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ लोहार यांनी केले आहेत.

रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी कोरोना काळात मुलांना वेगवगेळे प्रयोग करुन शिक्षण दिले आहे. त्यांच्या कामाची दखल जगाने घेतली आहे. परदेशात मुलांना कसं शिक्षण दिले जाते याचा अभ्यास त्यांनी केला आहे. डिसले गुरुजींना वर्ल्ड बँक शिक्षण सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा : मुंबई महानगरपालिका निवडणूक, वाढीव प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर

First Published on: January 21, 2022 11:03 PM
Exit mobile version