शिक्षणाधिकारी झनकर अखेर एसीबीच्या ताब्यात

शिक्षणाधिकारी झनकर अखेर एसीबीच्या ताब्यात

। शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्विकारणारया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने अटक केली आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. दरम्यान त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता आज त्यावर सुनावणी होणार होती.

आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (14 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच मागणारया नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. . लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचे समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. यावेळी तडजोडीनंतर ८ लाख रूपये देण्याचे ठरले होते. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

First Published on: August 13, 2021 11:17 AM
Exit mobile version