कल्याणच्या बकरी मंडीत बकर्‍यांची आवक घटली

कल्याणच्या बकरी मंडीत बकर्‍यांची आवक घटली

बोकड

 राज्याला महापुराने वेढल्याने त्याचा फटका सोमवारच्या बकरी ईदला बसला आहे. दरवर्षी कल्याणात 10 हजार बोकड येतात यंदा 3 हजार बोकड आले आहेत. राज्यातून विविध भागातून येणार्‍या अथवा राज्याबाहेरून येणार्‍या बोकडांची आवक घटली आहे. त्यामुळे बोकडांचा भाव वधारला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार भरतो. दरवर्षी बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकड खरेदी केले जातात. राज्याला पुराने झोडून काढले असल्याने राज्यातून व राज्याबाहेरून येणारे बकर्‍यांची आवक घटली आहे.

दरवर्षी बकरी ईदनिमित्त 10 हजार बकरे येतात. यंदा 3 हजार बकरे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. आवक घटल्याने कुर्बानीच्या बकर्‍यांचा भाव वाढला आहे. बाजारात एक बोकडाची किंमत दहा हजारापासून ते जास्तीत जास्त 35 हजार रुपयापर्यंत गेली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून आणले जाणारे बोकड पावसाच्या पूरामुळे विक्रीसाठी बाजारात आलेले नाहीत. राज्यातील काही भागातून बोकड विक्रीसाठी आले आहेत. रस्ते वाहतुकीस पुराचा फटका बसल्याने माल आलेला नाही. जागोजागी हा माल अडकून पडला आहे.

महापुराला फटका बोकडांना बसला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा बोकड खूपच कमी प्रमाणात विक्री साठी आले आहेत. बोकडांची आवक घटल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
-संजय उर्कीडे, मंडई व्यवस्थापक

First Published on: August 12, 2019 6:10 AM
Exit mobile version