नागपुरात शाळेजवळ कोसळली वीज; आठ विद्यार्थी जखमी

नागपुरात शाळेजवळ कोसळली वीज; आठ विद्यार्थी जखमी

नागपुरात शाळेजवळ कोसळली वीज

नागपुरातील रामटेक तालुक्यात असलेल्या आसोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते. मात्र, या दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपुरातील रामटेक आणि मौदा तालुक्यात गुरुवारी चांगलाच पाऊस झाला आणि त्याचा फटका नागपुरला बसला आहे. या दरम्यान, असोली या ठिकाणी वीज कोसळली असून यामध्ये आठ विद्यार्थी जखमी झाले. तर नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर, इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. राज्यात गुरुवारी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच कोकणातही चांगला पाऊस पडत आहे. याशिवाय मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणीही पावसाच्या सरी गुरुवारी रात्रीपासून कोसळत आहेत. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ठाणे, मुलुंड, डोंबिवली, बदलापूर भागातही चांगलाच पाऊस झाला आहे. दरम्यान नागपुरात रामटेक तालुक्यात असलेल्या आसोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

First Published on: June 28, 2019 1:37 PM
Exit mobile version