निकृष्ट रस्तेकाम, खड्ड्यांवरुन एकनाथ शिंदेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

निकृष्ट रस्तेकाम, खड्ड्यांवरुन एकनाथ शिंदेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

निकृष्ट रस्तेकाम, खड्ड्यांवरुन एकनाथ शिंदेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ठाणे शहरासह भिवंडीतील विविध भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग, ठाणे नाशिक महामार्गावरील डांबरच वाहून गेले असल्यामुळे मोठ-मोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे मागील २ ते ३ दिवसांपासून या ठाणे ते अमदनगर, ठाणे ते नाशिक रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. २ ते ३ तास एका जागेवरच वाहन उभीर राहिल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाणे प्रशान आणि पालकमंत्री खाडकन झाले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते पडघा रस्त्याची पाहणी करुन रस्ते कामासंबंधित सर्व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. खड्ड्यांमुळे गेल्या आठवडाभरात ११ किरकोळ मोटारसायकल अपघात झाले आहेत.

प्रचंड टीकेनंतर आणि नागरिकांच्या आक्रोशानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहेत. गेल्या काही दिवसापासून संपुर्ण ठाणे परिसरात, भिवंडी परिसरात, ठाणे -अमदाबाद हायवे, ठाणे -नाशिक हायवेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेला, लोकांना त्रास झाला या सगळ्या बाबी समोर आल्यामुळे आज ठाणे कॉर्पोरेशन, एमएमआरडीए, एमएसआरडीसीचे काही रस्ते पूल आहेत. पीडब्लूडीचे आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते आहेत. या संबंधांतील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना ज्याची ज्याची जी जबाबदारी आहे ती त्यांना पार पाडायला सांगितले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

खड्डे बुजवण्याचे आदेश

पावसामुळे रस्त्यांवर जिथे जिथे खड्डे पडले आहेत. तात्काळ खड्डे बुजवून टाकले पाहिजेत. खड्ड्यामुळे वाहतूक स्लो होते आणि वाहतूक कोंडी होती. यामुळे खड्डे भरण्यासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य, रेती वापरण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यापुर्वी हे रस्ते सुस्थितीमध्ये आणले होते असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश

सामान्य नागरिकांचा यामध्ये काही दोष नाही. यामध्ये शासनाची जबाबदारी आहे की, रस्ता चांगला ठेवला पाहिजे यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झाले ही अतिशय असमान्य घटना आहे. रस्त्याच्या कंत्राटदारांवर कारवाई होणार, ज्यांची ज्यांची रस्त्यांचे काम तपासण्याचे काम आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक शासन करण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सर्व चौकशी केली जाईल. ज्या ठेकेदाराने निकृष्ट काम केले त्यावर कारवाई होणार करावी असे महानगरपालिकेला निर्देश दिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  भिवंडी-ठाणे महामार्गावर खड्डेच खड्डे


 

First Published on: September 24, 2021 4:44 PM
Exit mobile version