ठाकरे सरकारच्या ‘त्या’ तीन निर्णयांना शिंदे सरकारची स्थगिती, पुन्हा नव्याने निर्णय घेणार

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ तीन निर्णयांना शिंदे सरकारची स्थगिती, पुन्हा नव्याने निर्णय घेणार

ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने अखेरच्या क्षणी कॅबिनेटची बैठक घेत, हे महत्वाचे निर्णय घेतले होते. मात्र, शिंदे सरकार या निर्णयांना स्थगिती देऊन पुन्हा नव्याने निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर सरकारला कॅबिनेटची बैठक घेता येत नाही. तरीदेखील ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी ही बैठक घेतली आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, यावर आक्षेप घेत ठाकरे सरकारच्या या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच याबाबतचं सूतोवाच केले होते. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावात शिंदे सरकार काही बदल किंवा पुन्हा एकदा नव्याने निर्णय घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : ‘ते’ तीन निर्णय फिरवले असतील तर, हे सरकार हिंदूत्वद्रोही; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल


 

First Published on: July 15, 2022 11:28 AM
Exit mobile version