राणेंच्या मुलांना कोकणी माणसाने यापूर्वीच लायकी दाखवली; केसरकरांकडून निलेश राणेंना प्रत्युत्तर

राणेंच्या मुलांना कोकणी माणसाने यापूर्वीच लायकी दाखवली; केसरकरांकडून निलेश राणेंना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण यांच्या पुत्रांमधील राजकीय वाद थांबवण्याचे नाव घेत नाही, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी केसकरांची लायकी काढल्यानंतर आता केसरकर यांनाही निलेश राणे यांची लायकी काढली आहे. राणेंच्या मुलांची काय लायकी आहे हे सात वर्षांपूर्वी कोकणच्या लोकांनी दाखवून दिली आहे. ते विसरले नसतील तर कोकणची जनता त्यांना पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवून देईल, अशा शब्दात केसरकरांनी निलेश राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज शिंदे गटाच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दीपक केसरकर माध्यमांशी बोलत होते.

केसकर म्हणाले की, राणेंची मुलं अजून लहान आहेत. माझ्यापेक्षा निम्म्या वयाची आहेत. त्यामुळे मला त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना वडिकलीच्या अधिकाराची जाण नसेल तर काही बोलण्याचा प्रश्नच नाही, असं सांगतानाच त्यांनी कुणाची लायकी काढून नये. त्यांची लायकी काय आहे हे सात वर्षांपूर्वीच कोकणच्या जनतेने दाखवून दिले. ते अजून विसरले नसतील तर पुन्हा एकदा कोकणची जनता दाखवून देईल.

निलेश राणे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही अस आमचं ठरलं आहे. त्यांनी दहा वेळा टीका केली तर मीही दहा वेळा बोलणार असा इशाराही केसरकरांनी दिला आहे.

नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडताना आपण मदत केली, असं शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे मी तसं म्हणालो. पण बाळासाहेबांचे शिवसैनिक पवारांच्या पालखीचे भोई कधीच होणार नाहीत. आमची एकी कधीही फुटणार नाही, शिवसेना हा महाराष्ट्राचा कणा आहे अभिमान आहे तो टिकला पाहिजे. असही केसरकर म्हणाले.


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, शरद पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश


First Published on: July 13, 2022 9:21 PM
Exit mobile version