एकनाथ शिंदे यांनी घेतली मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट, शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत

एकनाथ शिंदे यांनी घेतली मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट, शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत

एकनाथ शिंदे यांनी घेतली मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट, शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत

एमपीएससी परीक्षा उत्तीण होऊन नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट घेऊन आर्थिक मदत केली होती. तसेच राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तर आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केलं आहे. तसेच शिवसेनेकडून स्वप्नीलच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करण्यात आली असून स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ३१ जुलै अखेरपर्यंत १५,५०० हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिंदे यांनी गुरुवारी त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. याप्रसंगी, शिंदे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.

शिवसेना नेते शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गंभीर दखल घेऊन १५,५०० पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: July 15, 2021 7:58 PM
Exit mobile version