बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.., शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर

बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.., शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू… असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर मुंबईमध्ये शिवसेनेकडून जाहीर मिळावे घेतले जात आहे. यावेळी आसामच्या रॅडिएन्स ब्लू हॉटेलमध्ये आहेत, जी ४० लोकं आहेत, ती माणसं नाहीत, ती जीवंत प्रेत आहेत, त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. कारण त्यांचा आत्मा मेलेला असेल. ही चाळीस लोकं जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत राऊतांवर एक प्रकारे पलटवार केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर., असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू.., असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या, असे आव्हान संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. यावरूनही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे.


हेही वाचा : ‘एका बापाचे असाल तर राजीनामा द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान


 

First Published on: June 26, 2022 10:17 PM
Exit mobile version