घरट्रेंडिंग'एका बापाचे असाल तर राजीनामा द्या'; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

‘एका बापाचे असाल तर राजीनामा द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

Subscribe

"तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या'', असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

“तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या”, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. यावरूनही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. “शिवसेनेला एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, हे पळून गेले त्यांचे जवळपास २० ते २५ बाप आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. (shivsena sanjay raut slams eknath shinde and other revolt mlas maharashtra politics)

दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी उपस्थित आहेत. या मेळाव्यात संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. “तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही.”, असे राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

“आसामच्या रॅडिएन्स ब्लू हॉटेलमध्ये आहेत, जी ४० लोक आहेत, माणसे नाहीत, ती जीवंत प्रेत आहेत, त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. कारण त्यांच्या आत्मा मेलेला असेल. हे चाळीस लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील. त्यांना माहितीये की महाराष्ट्रात आग पेटलेली आणि त्या आगीत आपले काय होईल.”, असेही राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी आपल्या गावातल्या एका कार्यकर्त्याला फोन केला. फोनवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं गुवाहाटीमध्ये काय बाबा एक नंबर झाडं आहेत, डोंगर आहेत, हॉटेल आहेत. आता हे सांगताना त्यांनी जरा त्यांच्या गावाकडच्या शैलीत सांगितलं त्यामुळे ते वाक्य खूपच व्हायरल झालं. त्यांच्या याच वाक्याचा आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. गुवाहटीत झाडे, डोंगर आहे, मग महाराष्ट्रात काय स्मशानं आहेत का, असा सवाल विचारत संजय राऊत यांनी बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील यांच्यांवर हल्लाबोल केला. ‘रॅडिएन्स ब्लू मध्ये मी दहा वेळा राहिलोय मला माहित आहे ते हॉटेल कसे आहे.’, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

“गुलाबराव पाटील मोठमोठी वक्तव्य करायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळालाय. सांदीपन भुमरे, वॉचमन होता. याला वडा सांबार घेत येत नव्हता, जमिनीवर बसून वडा सांबार खात होता. आज कॅबिनेट मंत्री झाला. शिवसेनेमुळे मी झालो, म्हणून रडायला लागला, हे सगळे खोटे अश्रू होते. प्रकाश सुर्वे, भाजी विकत होता ना. पुन्हा भाजी विकतायला पाठवूया. महाराष्ट्राचा बिग बॉस आजही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत.”

“मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे म्हणून शिवसेना तोडायची आहे. शिवसेनेत यायचं, शिवसेनेचे संरक्षण घ्यायचे, प्रॉपर्ट्या करायच्या आणि त्याच पैशांनी शिवसेनेवर वार करायचे. उद्धव ठाकरेंना सांगितलंय, की ही घाण आता पुन्हा आपल्यात घेऊ नका. बाहेरुन येतात आणि आम्हाला शहाणपणा शिकवता? दिघे आम्हाला सांगू नका, गद्दारांना क्षमा नाही, हे दिघेंचं स्टेटमेन्ट मी लिहून घेतलेयं. तेव्हा हे कुठे होते अधर्मवीर. आता मर्सिडीज रिक्षा चालवतात. शिवसेनेला एकच बाप आहे, आणि कुणाला बाप चोरता येत नाही आणि ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे.”, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

“बाळासाहेबांनी वाढवली ती खरी शिवसेना आहे. सेना ही ५६ वर्षांची चिरतरुण आहे. अजिंक्य आहे. या सेनेला मरण नाही, असं राऊत म्हणाले. शंकराने हलाहल प्राशन करताना जे थेंब सांडले. त्यातून शिवसेना तयार झाली आहे. ज्या शिवसेनेने पहिली सत्ता ठाण्यात मिळवली. त्या ठाण्याच्या नेत्याने सूड उगवला आहे. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. या मराठी माणसाच्या मनगटात हिंदुत्व आणि रक्तात शिवसेना आहे. ज्याने बाळासाहेबांशी गद्दारी केली. तो संपला. हिम्मत असेल तर राजीनामा द्या. निवडणुकीला समोर उभे राहा. मी चॅलेंज करतो”, असं राऊतांनी म्हटले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसंच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांची खलबत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -