विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले.  हे अधिवेशन 25 तारखे पर्यंत सुरू राहणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत सभागृह नेत्यांची निवड कण्यात आली. याबाबत विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली.

काय म्हणाल्या निलम गोऱ्हे – 

मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेच्या सभागृह नेते पदासाठी पत्र दिले होते. त्या पत्रानुसार आणि विधानपरिषदेच्या नियमा नुसार विधान परिषद सभागृह नेते पदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली, अशी घोषणा निलम गोऱ्हे यांनी केली.

विरोधी पक्षनेत्यांचा परिचय –

विरोधी पक्षनेत्यांचा परिचय विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी करून दिला. यावेळी विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे निलम गोऱ्हे यांनी सभागृहाला सांगीतले. ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते झाल्यामुळे शिंदे विद्ध ठाकरे गट असा सामना सभागृहात पहायला मिळू शकतो.

नव्या सदस्यांचा परिचय  –

यावेळी विधानपरिषदेच्या नव्या सदस्यांचा परिचय उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी करून दिला. यामध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी यांचा परिचय करून देण्यात आला.

मेटेंना श्रध्दांजली –

विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेचे सदस्य विनायक मेटे यांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शोक प्रस्ताव सभागृहाने एक मताने पारीत केला.

First Published on: August 17, 2022 1:34 PM
Exit mobile version