लॉकडाऊनमुळे देशातील विजेची मागणी २२ टक्के घटली

लॉकडाऊनमुळे देशातील विजेची मागणी २२ टक्के घटली

देशभरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात शट डाऊन ची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसांपासून देशभरातील सर्व औद्योगिक क्षेत्र बंद आहे. तसेच कॉर्पोरेट ऑफिसेस देखील बंद आहेत. त्यामुळे देशभरातील वीज मागणीत २२ टक्क्यांनी घाट झाली आहे. २० मार्च रोजी देशाची १६३ गिगा वॅट इतकी विजेची मागणी होती. मात्र ज्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी रात्री १२ वाजल्यानंतर देशभरात लॉक डाऊनची घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी देशात विजेची मागणी १२७.९६ गिगा वॅट इतकी विजेची मागणी होती. तब्बल २२ टक्के विजेची मागणी घटली आहे. सुमारे ३५ गिगा वॅट विजेची मागणी कमी झाली आहे.


हेही वाचा – Coronavirus: गोरगरीब जनतेला पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत देणार


२० मार्च रोजी १६३.७२ गिगा वॅट विजेची मागणी होती, २१ मार्च रोजी १६१. झाली. २२ मार्च दिवशी जनता कर्फ्यू दिवशी ती १३५.२० गिगा वॅटइतकी झाली. सोमवारी ती पुन्हा वाढून १४५.२० गिगा वॅटइतकी झाली. मात्र त्यानंतर देशभर लॉक डाऊन केल्यानंतर मात्र हि मागणी १२७. ९६ गिगा वॅट इतकी घसरली. विजेची मागणी घसरल्यामुळे बुधवारी ६० पैसे प्रति युनिट इतके विजेचे दर होते. मागील ३ वर्षातील हे सर्वात कमी दार होते.

 

First Published on: March 26, 2020 6:50 PM
Exit mobile version