मुंबईसह राज्यात वीज दरवाढीचा शॉक, बेस्ट ग्राहकांना मात्र दिलासा!

मुंबईसह राज्यात वीज दरवाढीचा शॉक, बेस्ट ग्राहकांना मात्र दिलासा!

मुंबईतील वीज ग्राहकांना वीज दरात सवलत तर राज्यातील वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका देणारा निर्णय बुधवारी राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केला. टाटा, रिलायन्स, महावितरण आणि बेस्ट या कंपन्यांच्या बहुवार्षिक वीज दरांच्या याचिकेवर बुधवारी राज्य वीज नियामक आयोगाने आदेश दिला. नवीन वीज दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू होईल. नव्या निर्णयामध्ये राज्यभरातल्या वीज ग्राहकांना जरी वीज दरवाढीचा सामना करावा लागणार असला, तरी मुंबईतल्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. बेस्ट वीज ग्राहकांकडून याआधी वसूल करण्यात आलेला वाहतूक उपक्रमाचा तोटा हा आयोगाने परताव्याच्या रूपात दिला आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या विजेच्या दरात कपात झाली आहे. सरासरी ६ ते ८ टक्के दिलासा वीज ग्राहकांना मिळाला आहे.

असा मिळणार दिलासा

रिलायन्स आणि टाटा पॉवरचे दर वाढणार

रिलायन्स आणि टाटा या दोन्ही कंपन्यांच्या वीज दरात सरासरी १ टक्क्यापर्यंत वीज दरवाढ करण्यात आली आहे.


वाचा – सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना महावितरणाचे आवाहन


महावितरणच्या वीज ग्राहकांवर वीज कडाडणार!

महावितरणच्या कृषी ग्राहकांच्या वीज दरात १० पैशांची युनिटमागे वाढ करण्यात आली आहे. ३.३५ रुपयांवरून नवीन वीजदर ३.४५ रूपये असे जाहीर करण्यात आले आहेत. तर घरगुती वीज ० ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा वीजदर ५.०७ रुपयांवरून ५.३१ रुपये करण्यात आला आहे. १०१-३०० युनिट विजेचा वापर असणाऱ्या वीज ग्राहकांचा दर ८.७४ रुपयांवरून ८.९५ रूपये प्रति युनिट करण्यात आला आहे. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन

दरम्यान इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ६ रूपये असा दर ठरविण्यात आला आहे.


तुम्हाला हे माहितीये का? – थकबाकीदारांपुढे महावितरणचे लोटांगण

First Published on: September 12, 2018 10:00 PM
Exit mobile version