कोकणात कोरोनाचा धोका वाढला; रत्नागिरीत १५६ तर सिंधुदुर्गात १७ रुग्ण

कोकणात कोरोनाचा धोका वाढला; रत्नागिरीत १५६ तर सिंधुदुर्गात १७ रुग्ण

कोरोना विषाणू

कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज रत्नागिरीत ११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५६ वर पोहोचला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ वर गेला आहे.

२४ तासांत २४ पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून धक्कादायक बाब म्हणजे २४ तासांत २४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर खेड तालुक्यातील ताले या गावातील एकाच कुटुंबातील ४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांना कोरोना

मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. याच चाकरमान्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रत्नागिरीत तालुक्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत तालुक्यात आतापर्यंत ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

किती तालुक्यात किती रुग्ण?

तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ मे रोजी ८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कणकवलीमध्ये ६, वैभववाडी येथे १ आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर २४ मे रोजी आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे.

रत्नागिरीत ५५ जणांना सोडले घरी

रत्नागिरीत आतापर्यंत ५५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रत्नागिरीत सध्या ९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १७ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – शाळा बंद असताना सरल आयडी आणायचा कोठून? विद्यार्थ्यांसमोर प्रश्न 


 

First Published on: May 25, 2020 6:24 PM
Exit mobile version