धरणालगत घेता येणार सायकलिंगचा आनंद

धरणालगत घेता येणार सायकलिंगचा आनंद

Bicycle sign or icon on the road in the dam.

सायकल प्रेमींना गंगापूर धरणालगत बॅक वॉटरला सायकलिंगचा आनंद घेता यावा याकरीता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला बोट क्लब आणि पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. याच परिसरात कन्व्हेन्शन सेंटरही उभारण्यात येत आहे. नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला जलसंपदा विभागाच्या ताब्यातील जागेत सायकल ट्रॅक प्रस्तावित करावा असा प्रस्ताव जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिला होता. भुजबळ यांनी हा प्रस्ताव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. ठाकरे यांनी तातडीने या प्रस्तावाची दखल घेत यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाला दिले आहेत.

इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंडच्या धर्तीवर साकारणार ट्रॅक
धरण बांधतांना ब्रिटीशांनी गंगापूर धरणाच्या पाण्यालगत जादा पूर क्षेत्रासाठी अतिरिक्त जागा भूसंपादन करून ठेवलेली आहे. या बॅक वॉटरलगत गिरणारे, नागलवाडी, पिंपळगाव गरूडेश्वर, ओझरखेड, गणेशगाव, गंगावर्‍हे, सावरगाव आदि गावे येतात. धरणाच्या पाण्या लगतची साधारणपणे १०० मीटर रूंदीची जागा जलसंपदा विभाागच्या ताब्यात आहे. त्यामुळे पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी धरणाच्या पाण्यालगत ९ मीटर रूंदीचा सायकल ट्रॅक विकसित करणे शक्य आहे. अशा पध्दतीने इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड या देशात सायकल ट्रॅक विकसित करण्यात आले आहेत.

First Published on: February 16, 2021 1:35 PM
Exit mobile version