शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी सरकारला धोका नाही; आमदार बच्चू कडू यांचे विधान

शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी सरकारला धोका नाही; आमदार बच्चू कडू यांचे विधान

A letter from Sharad Pawar and inclusion of 52 castes in OBC Bacchu Kadu said directly true OBC leader

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, अशा परिस्थिती हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. अशात आता शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केल आहे. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुध्दा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनवू शकतो. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असे धक्कादायक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही

मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे, केंद्रात भाजप सरकार राज्यात भाजप सरकार त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. अशा शब्दात बच्चू कडून यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

हेही वाचा : …अशा बालिश चर्चा करण्याऐवजी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी : अजितदादा पवार

 

ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम, पटोलेंना प्रत्युत्तर 

नाना पटोलेंनी दोन मंत्र्यांचे शिंदे- फडणवीस सरकार अंपग असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देत बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांगांना कमजोर समजणे म्हणजे नाना पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम आहेत. तसेच नानांनी आपले शब्द मागे घ्यावे अशी मागणी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.

बच्चू कडू पुढे म्हणाले की,  राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांचे सरकार आहे. हे आजच नाही तर यापूर्वीही असे सरकार सत्तेत होते. त्यामुळे दोघेही राज्य सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्यासमोर अनेक अडचणी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी शेतकऱ्यांचे काही नुकसान होऊ दिले नाही त्यांना विविध सवलती देण्याची घोषणा राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मदत भेटली नाही असे होणार नाही, असे झाल्यास सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मग सरकारच्या… असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अजित पवारांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर बच्चू कडू म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी झाली, मात्र नियमानुसारचं ओला दुष्काळ जाहीर केला जातो. त्यानुसार दुष्काळ जाहीर केला जाईल. याची कल्पना विरोधी पक्षनेते अजित पवारांना कल्पना आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केल्याने आंदोलनाची गरज नाही, जर सरकारने मदत दिली नाही तर आम्ही सुद्धा सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

राज्यातील या परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दौरे करून माहिती घेत आहेत. विस्तार करण्यापेक्षा दौरे करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.


बाळासाहेबांचे हिंदुत्व मुख्यमंत्री शिंदे पुढे घेऊन जातील, निहार ठाकरेंना विश्वास

First Published on: July 30, 2022 8:06 AM
Exit mobile version