पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पोस्टरबाजी करत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी 17 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाले. राज्यात सत्ता बदल झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – फडणवीस सरकारची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार ते पावसाळी अधिवेश या दरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लबोल केला काळ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला तर तर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी आजही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

हे ही वाचा – ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची पोस्टरबाजी

1) आज 18 ऑगस्ट 2022 पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.

2) अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायाला मिळालं.

3) गद्दारांना ताट – वाटी चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.

4) ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. ईडी सरकार हाय हाय. फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो असं म्हणत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.

5) बुधवारी 17 ऑगस्ट 2022 रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले.

6) विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टर बाजी करत घोषणा दिल्या.

7) 50 खोके, एकदम ओके. ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. बेकायदा सरकार हाय हाय…अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारवर हल्ला बोल केला

8) शिवसेनेतून बंडखोरी करून जे आमदार गेले ते विधानभवनात ज्यावेळी येत होते त्यावेळी आले रे आले गद्दार आले असं म्हणत विरोधकांनी बंडखोरी केलेल्या आमदारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

9) शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी, ईडी कारवाया आणि एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीवर घोषणाबाजी केली.

 

10) यावेळी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह नितीन राऊत, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, प्रणिती शिंदे, नाना पटोले, छगन भुजबळ यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी दिसले. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी घोषणाबाजी देत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला.

First Published on: August 18, 2022 12:33 PM
Exit mobile version