प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा योजना रुग्णालय असणार – हसन मुश्रीफ 

प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा योजना रुग्णालय असणार – हसन मुश्रीफ 

राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान 30 बेडचे एक रूग्णालय उभारण्यात येणार आहे, या महामंडळाच्या दहा किलो मीटरपुढे एक रूग्णालय ही अट काढण्यात येणार असून,आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री तथा कमर्चारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी येथे दिली.

कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची 112 वी बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री तथा ई.एस.आय.सी.चे उपाध्यक्ष राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ.निलिमा केरकट्टा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच महामंडळावर नियुक्त सदस्य ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपस्थित होते.

कोविड काळात ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करून राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयांना प्राथम्याने सर्व सोयीसुविधा देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापूर येथे लवकरात लवकर एक रूग्णालय उभारण्यात यावे, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी महामंडळास केल्या. रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी असल्याने ती तात्काळ भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे कामगारांना योग्य सुविधा मिळाली नाही असे होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स असणार आहेत.


हे ही वाचा – OBC Reservation: ओबीसींचा मंजूर झालेला कायदा निवडणूक आयोगाला मान्य करणे बंधनकारक – छगन भुजबळ


 

First Published on: February 1, 2022 9:43 PM
Exit mobile version