ठाण्यात व्हिडिओ कॉलद्वारे घेता येणार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला!

ठाण्यात व्हिडिओ कॉलद्वारे घेता येणार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला!

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ठाणे शहरातील खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतःच्या घरातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा अशा प्रकारचा भारतातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे.

डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून www.touchbase.live ह्या वेबसाईट वर जाऊन थेट व्हिडिओ कॉल करून नागरिक यादीमधील उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात.

नागरिक आपल्या स्मार्ट मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. ठाण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा पूर्णत: मोफत पुरवली जाणार असून इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

भारतात हा उपक्रम सर्वात प्रथम राबवणारी ठाणे महापालिका प्रथम महापालिका ठरली आहे. फाइंड्याबिलिटी सायन्सेस या कंपनीने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ३० जून पर्यंत ही सेवा मोफत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त डॉक्टरांनी देखील पुढे येऊन या वेबसाईटवर नोंदणी करून दिवसातील किमान १-२ तास या सेवेसाठी द्यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कसा कराल वापर?
१.आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बाऊजर वरून www.touchbase.live/ ह्या वेबसाईटवर ‘क्लायंट साइन अप’ येथे क्लीक करा.
२.आलेल्या फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती भरा.
४. संपूर्ण माहिती भरल्यावर तुमचे अकाउंट तयार होईल
५. अकाउंट तयार झाल्यावर ‘साइन अप’ करा
६. डॅशबोर्डवर उपलब्ध डॉक्टरांच्या यादीतून, तुम्हाला हव्या असलेल्या डॉक्टरांना सिलेक्ट करून कॉल करा.
७. काही क्षणातच तुम्ही डॉक्टरांशी जोडले जाल आणि तुम्ही तुमच्या समस्या डॉक्टरांना विचारू शकाल.

First Published on: April 11, 2020 6:55 AM
Exit mobile version