मुंबई ते अमृतसर / चेन्नई दरम्यान दैनिक विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

मुंबई ते अमृतसर / चेन्नई दरम्यान दैनिक विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

Year End 2023: मुंबईकरांनो बिनधास्त Enjoy करा थर्टी फस्ट! Centreal Railway कडून 31 डिसेंबरला विशेष लोकलची व्यवस्था

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर दैनिक विशेष

०१०५७विशेष गाडी १० एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २३.३० वाजता सुटेल आणि अमृतसरला तिसर्‍या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.

०१०५८ विशेष गाडी १३ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमृतसर येथून दररोज ०८.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी ००.०५ वाजता पोहोचेल.

थांबे : मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कल्याण, कसारा (केवळ ०१०५७ साठी), इगतपुरी (केवळ ०१०५७ साठी), नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, रावेर, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा.

थांबे आणि वेळांच्या तपशीलवार माहीतीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीयवातानुकूलित, ८ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई दैनिक अतिजलद विशेष

०११५९ अतिजलद विशेष गाडी १० एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १२.४५ वाजता सुटेल आणि पूरैची थलिवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथे दुसर्‍या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल.

०११६०अतिजलद विशेष गाडी ११ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पूरैची थलिवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल येथून दररोज १३.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १२.३० वाजता पोहोचेल.

थांबे : मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कल्याण, कर्जत (केवळ०११५९साठी), लोणावळा (केवळ ०११५९ साठी), खडकी, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलाबुरागी.

थांबे आणि वेळांच्या तपशीलवार माहीतीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

संरचना : १ द्वितीयवातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : पूर्णतः राखीव विशेष ट्रेन ०१०५७ आणि ०११५९चे विशेष शुल्कासह बुकिंग ५ एप्रिल २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर वर सुरू होईल.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


हे वाचा-  वाझेच्या हृदयातील रक्तवाहिन्यात ९० टक्के ब्लॉकेजेस; वकील वैद्यकीय मदतीची मागणी करणार

First Published on: April 3, 2021 3:57 PM
Exit mobile version