त्या मायलेकांचे मृत्यूनंतर नेत्रदान

त्या मायलेकांचे मृत्यूनंतर नेत्रदान

मायलेकाचे नेत्रदान

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथे मंगळवारी सकाळी मानसिक आजाराने ग्रासलेल्या तन्मय दासगुप्ताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली होती. मुलाने गळफास घेऊन जीवन संपवल्याने याचा धक्का आई शुक्ला दासगुप्ता यांना बसला आणि त्यांच हृदय विकाराच्या झटक्याने जागीच निधन झालं. दरम्यान, निधनापूर्वी आई शुक्ला दासगुप्ता यांनी त्यांची विवाहित मुलगी सोनाली बराट हिच्याकडे अवयव दानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मृत शुक्ला दासगुप्ता आणि मुलगा तन्मय यांचे डोळे दान करण्यात आले असल्याची अशी माहिती सोनाली बराट यांचे पती आशिष बराट यांनी दिली आहे.

एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जात. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे मंगळवारी दासगुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच कुटुंबातील आई आणि मुलाने जग सोडल्याची घटना समोर आली होती. परंतु, अशी दुःखद घटना घडली असताना देखील मुलगी सोनाली यांनी आई शुक्ला दासगुप्ता आणि भाऊ तन्मय याचे डोळे दान करायचे ठरवले. त्याप्रमाणे दोघांचेही मृतदेह औंध हॉस्पिटलमधील शवागरात आणण्यात आले. तेव्हा डोळे दान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एकीकडे भाऊ आणि आई यांनी कायमचे डोळे मिटले होते. परंतु, त्याच डोळ्यांनी आता दोन अंध व्यक्ती हे सुंदर जग पाहणार आहेत. मृत शुक्ला दासगुप्ता यांनी अवयवदान करण्यासंबंधी मुलगी सोनाली बराट हिच्याकडे माझे काही बरेवाईट झाले, तर डोळे दान करावेत, अशी इच्छा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. सोनाली बराट या मृत आई शुक्ला दासगुप्ता यांच्या राहत्या घरापासून काही अंतरावर राहण्यास आहेत. तर दुसरा मुलगा बंगळुरु येथे राहतो.

फोन न घेतल्याने आला संशय 

सोमवारी संध्याकाळी तन्मय उशिरा घरी आला. तो त्याच्या बेडरूममध्ये जाऊन झोपला. तो मानसिक आजाराने ग्रासलेला होता. त्याच्यावर दहा वर्षांपासून उपचार सुरू होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो उपचार घेण्यास तयार नव्हता तो वेळेवर गोळ्या घेत नव्हता. त्यामुळे त्याला सोमवारी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र तिथून तो पळून आला. रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आला आणि गळा कटरने कापून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बेडवर कटर आणि भाजी चिरायची विळी आढळली असून तो जखमी झाला होता. परंतु त्याने पुन्हा वायरने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई शुक्ला दासगुप्ता या त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पाहताच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दररोज सकाळी मुलगी सोनाली आणि मयत शुक्ला फिरायला जातात. मात्र मंगळवारी सकाळी मुलीच्या फोनला प्रतिसाद न मिळाल्याने मुलगी थेट घरी आली आणि सर्व प्रकार समोर आला.

वाचा – धक्कादायक! मुलाच्या आत्महत्येनंतर आईचाही मृत्यू

First Published on: February 7, 2019 3:02 PM
Exit mobile version