घरमहाराष्ट्रधक्कादायक! मुलाच्या आत्महत्येनंतर आईचाही मृत्यू

धक्कादायक! मुलाच्या आत्महत्येनंतर आईचाही मृत्यू

Subscribe

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथे मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाला आत्महत्या करताना पाहून त्याच्या आईला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याही मृत्यूमुखी पडल्या.

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथे मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे मुलाला आत्महत्या करताना पाहून त्याच्या आईला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याही मृत्यूमुखी पडल्या. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे राहत्या घरी घडली. तन्मय दास गुप्ता असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून शुक्ला दास गुप्ता (वय ६५) असं हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आईचे नाव आहे. दरम्यान, तन्मयने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

तरुण होता मनोरुग्ण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होत. त्याने गेल्या दोन महिन्यांपासून गोळ्या घेतलेल्या नव्हत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री आई शुक्ला दास गुप्ता यांनी तन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तो घरी आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या मुलाची आत्महत्या पाहून शुक्ला यांना जागीच हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा बंगळुरू येथे असतो. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -