Corona: मिरजमधील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण!

Corona: मिरजमधील महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण!

महाराष्ट्र पोलीस

सांगली पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मिरजमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. या महिला पोलीस अधिकाऱ्याचा अहवाला काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे चार पोलिस आणि दोन अधिकाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. सांगली पोलीस दलाला मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले होते.

सांगली कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला सोमवारी घ्यावा लागला. २२ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै रात्री १० पर्यंत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती या ठिकाणी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत हा लॉकडाऊनचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजारहून अधिक आहे. सांगली, मिरज, कुपवाडा या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शहरातील आकडा ३००वर पोहोचला आहे.


हेही वाचा – Corona Update: आज औरंगाबादमध्ये १७९ नव्या रुग्णांची वाढ, एकूण आकडा ११,४२०वर!


 

First Published on: July 21, 2020 11:01 AM
Exit mobile version