चारित्र्याच्या संशयावरुन मोबाईल तपासणाऱ्या पतीवर महिला पोलिसाचा गोळीबार

चारित्र्याच्या संशयावरुन मोबाईल तपासणाऱ्या पतीवर महिला पोलिसाचा गोळीबार

कोरोनापासून वाचण्यासाठी अमेरिकेने खरेदी केल्या १९ लाखाच्या बंदुका

पती-पत्नी यांच्या नात्यामध्ये विश्वास फार महत्त्वाचा असतो. या विश्वासाची शिदोरी जितकी घट्ट असते, तितकच घट्ट नातही असतं. परंतु, या विश्वासावर तडा जातो आणि त्याचे रुपांतर चिखलफेक आरोपांमध्ये आणि चारित्र्य संशयावर होते, तेव्हा नात्यामध्ये विद्रोहाचा जन्म होतो आणि हा विद्रोह जीवघेणा ठरतो. अगदी अशीच घटना छत्तीसगड येथील भाटापारा जिल्ह्यात घडली आहे. पती चारित्र्यावर वारंवार संशय घेतो, त्या संशयातून मोबाईल तपासतो त्यामुळे संतापलेल्या महिला पोलिसाने आपल्याच पतीवर गोळीबार केला आहे. महिला पोलिसाने आपल्या पतीवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. या पुरुषाला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिला पोलिसाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सुनीता मिंज असं या महिला पोलिसाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तीचं दीपक श्रीवास्तव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. सुनीताचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय दीपकला होता. या संशयामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद सुरु होते. दीपक वारंवार सुनीताचा मोबाईल तपासायचा. त्यामुळे सुनीताला दीपकचा फार राग यायला लागला. त्यानंतर दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. अशाच एकेदिवशी तपास केल्यानंतर काहीच निष्पन्न झाले नाही, त्यामुळे दीपकने सुनीताचा मोबाईल तपासला तेव्हा सुनीताने आपल्या सर्व्हिस रिव्हॉलवरने दीपकरवर तीन गोळ्या झाडल्या.

२०१३ पासून लिव्ह इनच्या नात्यात

दीपकला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे पोलिसांना दिलेल्या जवाबात दीपकने सांगितले की, ‘ते २०१३ पासून लिव्ह इनच्या नात्यात राहत होते. तेव्हाही दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद होत असे आणि त्यावेळीही दीपकने सुनीताचा फोन तपासला होता.’ सुनीताला सध्या सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिला अटक करण्यात आले आहे.

First Published on: March 12, 2019 2:58 PM
Exit mobile version