अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर; या तारखेपासून सुरु होणार परीक्षा

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर; या तारखेपासून सुरु होणार परीक्षा

कोरोनामुळे प्रलंबित अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुंबई विद्यापीठाने पॅटर्न जाहीर केला आहे. यामध्ये कशा पद्धतीने परीक्षा घ्यायच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयांवर असणार आहे. ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने मुंबई विद्यापीठाची परीक्षा असणार आहे. २५ सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरु होणार आहेत तर १ ऑक्टोबर २०२० पासून रेग्यूलर परीक्षा सुरु होणार आहेत.

१. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अंतिम सत्र/वर्षाच्या पदवी, पदव्युत्तर, व पदविका या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी व त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांसाठी पर्विष्ट विद्यार्थांनी परीक्षा अर्ज सादर केले असतील त्याच विद्यार्थांची परीक्षा घेण्यात यावी.

२. महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील अंतिम सत्राच्या विद्यार्थांची माहिती संकलित करावी. (उदा. मोबाईल नंबर, आमेल, PRN क्रमांक, ऑनलाइन परीक्षेबाबत लागणारी साधन सामग्री जसे की लॅपटॉप, संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट आणि विद्यार्थी सद्यस्थितीत कुठे आहे. इत्यादी).

३. मार्च, २०२० मध्ये ज्या महाविद्यालयांतील अंतिम सत्र/वर्षाच्या प्रात्यक्षिक/प्रकल्प/मौखिक परीक्षा घेण्यात आल्या असतील तर त्या पुन्हा घेण्यात येवू नयेत.

४. परीक्षांच्या सुयोग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखांनिहाय (पारंपारिक महाविद्यालय, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षण, विधी, फार्मसी, फाईन आर्ट्स इ.) महाविद्यालयांचे क्लस्टर्स तयार केलेले आहेत. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयाने लीड महाविद्यालय म्हणून विद्यापीठाने परीक्षेच्या नियोजनाची निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे.

५. ज्या विद्यार्थांचे विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर केलेले आहेत, परंतु परीक्षा शुल्क भरलेले नाहीत अशा महाविद्यालयांनी त्वरित विद्यापीठाकडे शुल्क भरावे.

६. विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले आहेत त्यांना आसन क्रमांक देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांनी करावा.

७. महाविद्यालयांना परीक्षा घेण्यासाठी जे विविध अहवाल आवश्यक असतात ते MKCL पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसंच काही परीक्षांचे अहवाल पारंपारिक पद्धतीने महाविद्यालयांना पाठविण्यात येतील.

८. ज्या अभ्यासक्रमांना अंतर्गत परीक्षा (Internal Exams/ Term work) आहेत त्या परीक्षांच्या गुणांच्या नोंदी महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या नसतील तर त्यांनी १५ सप्टेंबर २०२० च्या आत सदर गुणांच्या नोंदी कराव्यात.

९. अंतिम सत्रात प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या Lower Exam चे निकाल ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्याविषयी कळविण्यात आले होते, परंतु त्यात ज्या महाविद्यालयांनी नोंदी पूर्ण केलेल्या नसतील त्यांनी त्या क्वरीत पूर्ण कराव्यात.

१०. अंतिम वर्षाच्या तसंच बॅकलॉगच्या Practical, Project, Viva-Voce परीक्षा महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने (Zoom App., Google
Meet, Skype) किंवा आवश्यक असल्यास दुरध्वनीद्वारे मोखिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून २०२० पासून घ्याव्यात.

११. परीक्षा एकाच वेळी घेण्यात येतील अशा पद्धतीने ऑनलाइन वेळापत्रक तयार करावं. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना द्यावं.

१२. २५ सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरु कराव्यात. रेग्यूलर परीक्षा १ ऑक्टोबर २०२० पासून सुरु कराव्यात. सर्व थिअरी परीक्षा १७ ऑक्टोबर २०२० पर्यंत संपवाव्या.

१३. अंतिम सत्राच्या परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत घेण्यात याव्यात.

१४. अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Question) देऊन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी. अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा घ्यावी.

१५. अंतिम वर्षाची परीक्षा ५० गुणांची होणार असून १ तासाचा कालावधी असणार आहे.

१६. परीक्षेच्या तयारीसाठी आणि अनुभवासाठी विद्यार्थांना Sample MCQ questions देऊन त्यांची सराव परीक्षा घ्यावी.

First Published on: September 9, 2020 10:56 AM
Exit mobile version