लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल

भिडे गुरुजी

सांगलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनचा नियम मोडल्याप्रकरणी आयपीएस (IPC) कलम १८८ अंतर्गत भिडे गुरुजींविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजींनी लॉकडाऊनच्या काळात सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही समंती घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव येथे आले होते. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतर जिल्हा प्रवेश करण्यास मर्यादा आणल्या आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, भिडे गुरुजी यांनी परवानगी न घेता नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे प्रवेश केल्याने जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – भरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल


 

First Published on: May 29, 2020 10:44 PM
Exit mobile version