आता करोनाबाबत अफवा पसरवल्यास एफआयआर!

आता करोनाबाबत अफवा पसरवल्यास एफआयआर!

चिकनमध्ये करोना व्हायरस ही अफवा

चीनमध्ये धुमाकूळ माजवणार्‍या करोना व्हायरसची धास्ती सध्या देशात सुद्धा पसरली आहे. त्यातच याप्रकरणी अनेक मेसेज सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहेत. त्यातच ब्रॉयलर चिकनमध्ये करोना व्हायरस सापडल्याचे मेसेज वार्‍यासारखे पसरले आहे. त्यामुळे चिकन खाऊ नये, असे मेसेज पसरवले जात आहेत. त्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील मेसेज आता सोशल मिडीयावर व्हायरल केल्यास त्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. चिकन खाल्याने करोनाचा धोका असल्याची अफवा पसरवल्यामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

कोंबड्यांची मागणी ६० टक्क्यांनी घटली?

चिकन खाल्ल्याने करोनाचा धोका असल्याची अफवा पसरवल्यामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. परिणामी पोल्ट्री फार्म चालवणाऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्याला आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार लातूर जिल्ह्यात दररोज ३० ते ३५ टन कोंबडीच्या मांसाची विक्री होत होती. तर लातूर शहरात १० ते १२ टन चिकनची मागणी होती. पण या अफवेमुळे कोंबडीची मागणी साठ टक्क्यांनी घसरली आहे.


ऐका तज्ज्ञांचं मत – चिकनमध्ये करोनाचा व्हायरस नाही-डॉ. अजित रानडे

अफवांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, शिवाय पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे याबाबत सुनील केदार यांनी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, ‘चिकन खाल्ल्याने करोनाची लागण होत नाही. मात्र, करोना विषाणूचा संबंध कोंबडी खाल्ल्याशी जोडला आणि अफवा पसरवण्यास सुरवात झाली’.


हेही वाचा – पुरुषांनो सांभाळा, ‘सेक्स हार्मोन्स’मुळे करोनाचा तुमच्यावर डोळा!
First Published on: February 17, 2020 10:37 PM
Exit mobile version