चांदवडमध्ये खाजगी कोविड सेंटरला आग

चांदवडमध्ये खाजगी कोविड सेंटरला आग

जिल्ह्यातील चांदवडमध्ये एका खासगी कोविड सेंटरला भीषण आग लागली आहे. आजपासूनच हे कोविड सेंटर सुरू होणार होते, मात्र, त्याआधीच कोविड सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उपविभागीय अधिकारी सी.एस.देशमुख यांनी सांगितले.

मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथे नेमिनाथ जैन महाविद्यालयासमोर एका इमारतीत तालुक्यातील काही खाजगी डॉक्टरांच्या सहभागाने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. इमारतीच्या तिसरया मजल्यावर सुरू करण्यात येणार्‍या या कोविड सेंटरचे उदघाटन मंगळवारी दुपारी होणार होते. परंतु दुपारी या कोविड सेंटरला अचानक आग लागली. या कोविड सेंटरच्या खाली मौनगिरी हे फर्निचरचे दुकान आहे. या फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती. लाकडी साहित्य असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले फर्निचरच्या दुकानाला लागलेली आग कोविड सेंटर पर्यंत पोहोचली. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे. आगीची माहिती मिळताच मालेगाव,पिंपळगाव, चांदवड,मनमाड येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. सुमारे तासाभरानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मनमाडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथे खाजगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आजपासून हे कोविड सेंटर सुरू होणार होते मात्र तत्पूर्वीच या सेंटरला आग लागली. सुदैवाने येथे रूग्णांना दाखल करण्यात आले नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या कोविड सेंटरचे मोठे नुकसान झाले.
सी.एस.देशमुख, उपविभागीय अधिकारी, चांदवड

First Published on: April 6, 2021 6:08 PM
Exit mobile version