विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला आग; पाच कामगार जखमी

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला आग; पाच कामगार जखमी

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला आग; पाच कामगार जखमी

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विजनिर्मिती प्रकल्पाला शुक्रवारी आग लागली. या आगीत पाच कामगार होरपळे आहेत. या जखमी कामगारांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्यासाठी १२ अग्नीशमक बंबाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी उपस्थित राहत मदतकार्य करण्यासाठी सूचना दिल्या. विखे यांची फेब्रुवारी महिन्यातच कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यासह प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.


हेही वाचा – Corona Breaking: उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद


कारखान्याने वीजनिर्मितीसाठी सदर प्रकल्प गँमन इंडिया कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी वेल्डींगचे काम सुरु होते. यावेळी आजूबाजूस पडलेल्या भुश्यावर ठिणग्या पडल्या त्यानंतर ही आग लागली.

 

First Published on: March 20, 2020 5:48 PM
Exit mobile version