घरताज्या घडामोडीCorona Breaking: उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद

Corona Breaking: उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद

Subscribe

आज राज्य सरकारवर ही नाईलाजाने परिस्थिती आली आहे की नाईलाजाने परिस्थिती आली. आपल्याला मुंबई शहर म्हणून जगण्यासाठी घरात थांबण्याची स्थिती आली आहे. मी केलेल्या आवाहनानंतर गर्दीत फरक पडला आहे. पण पुढचे १५ दिवस अतिशय महत्वाच आहेत. आता तरी संपर्क संसर्ग टाळण्याशिवाय दुसरे कोणते शस्त्र नाही. म्हणून अत्यंत नाईलाजानेच आम्ही शहरातील सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय़ घेत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. महाराष्ट्र सरकार काळजीपाई काही गोष्टी घेत आहे. त्यापैकी कार्यालये बंद करणे हा एक उपाय आहे. काही लोक आम्हाला ट्रेन, बस बंद करा असे सांगत होते. पण शहराला सेवा पुरवणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांमुळे ही गोष्ट करणे योग्य नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महानगर परिसर पुणे पिंपरी, नागपुर परिसरासाठी हा कार्यालय बंद करण्याचा निर्णय ३१ मार्चपर्यंत लागू राहील. महानगरात जीवनावश्यक गोष्टी सर्व ऑफिसेस दुकाने बंद ३१ मार्चपर्यंत असतील. या कालावधीत २५ टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. हे २५ टक्के कर्मचारी संपुर्ण राज्याचा भार घेतील असेही त्यांनी सांगितले.

करोनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी समाजातील अनेक संस्था पुढे येत आहेत. काही जणांनी या संकटातून मदत करायला सुरूवात केली आहे. म्हणूनच मला अभिमान वाटतो की प्रत्येक जण या लढ्यात माझ्यासोबत आहे. आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज हे आता आपल काम थांबवून ते मदत करायला पुढे आले आहे. त्यामध्ये चित्रपट सृष्टीतील दिग्गज आहेत. या सगळ्यांनी मिळून एक शॉर्ट फिल्म केली आहे. त्यासाठी रोहित शेट्टी यांनी पुढाकार घेत अप्रतिम असे योगदान दिले आहे. ही फिल्म त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केली आहे. सीएमओ ऑफिसमधून ही फिल्म आता प्रसारीत करण्यात आली आहे. रोहित शेटी, अमिताभ बच्चन, अनिल कपुर, माधुरी दीक्षित, आलिया भट, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, अर्जुन कपुर, रणवीर सिंह, वरूण धवन, अजय देवगन, आयुषमान खुराना, विराट कोहली, सचिन प्रत्येकजणाने आपआपल्या परीने आवाहन केले आहे. या सगळ्या एकजुटीसाठी चांगला प्रतिसाद मिळतोय. आपल नात हे विश्वासाच नात आहे, आपण एकत्रच या संकटावर मात करू शकतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

बेस्ट, लोकल बंद करणे शेवटचा पर्याय

बेस्ट आणि लोकल सेवा या शरीराच्या शहराच्या वाहिन्या आहेत. या वाहिन्या बंद करणे शक्य होणार नाही कारण शहरासाठी सेवा पुरवणारा मोठ्या प्रमाणातील कर्मचारी वर्ग हा बेस्ट आणि लोकलच्या माध्यमातूनच प्रवास करतो. अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्मचारी वर्ग शहरात यावा म्हणून आताच्या घडीला लोकल आणि बेस्टची सेवा बंद करत नाही. आपल्या शहरातील फॅमिली डॉक्टर, कर्मचारी, मोठी रूग्णालये यासाठीचा कर्मचारी, डॉक्टर्स यांची ने आण कशी होणार म्हणूनच लोकल सेवा सुरू ठेवत आहोत. महापालिका कर्मचारी हे शहराची साफसफाई करतात, शहराला पाणी सोडणारे – बंद करणारे कर्मचारी, बस, एम्ब्युलन्स ड्रायव्हर यासारख्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू ठेवणे गरजेचेच आहे असेही ते यावेळी म्हणाले. या दोन सेवा बंद न करता इतर सर्व सेवा बंद करत आहोत. गरज पडल्यास या सेवा बंद करणे हा शेवटचा उपाय असेल असेही ते यावेळी म्हणाले. जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद करा असेही आवाहन मी यानिमित्ताने करत आहे असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक संकट डोकावतयं

लोक या काळात आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू शकतात. बॅंक – आर्थिक व्यवहार महत्वाचा भाग आहे. पुढचे संकट आर्थिक येणार आहे, त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी अभ्यासगट नेमला आहे. ज्या गोष्टी बंद होतील, संस्थांना मालकांना विनंती करतो आहे की जरी एकमेकांशी संपर्क ठेवा. एकमेकांशी नाते घट्ट ठेवून संकटावर मात करायच असेही आवाहन त्यांनी केले. ज्यांचे तळहातावर पोट आहे, कृपाकरून तो बंद करू नका, माणुसकी संपवू नका असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ही फिरण्याची सुट्टी नाही

ही फिरण्यासाठीची सुट्टी दिलेली नाही. आपल्या हिताचा निर्णय म्हणून आपण बस, रेल्वेची गर्दी कमी कऱण्यासाठी हा निर्णय घेत आहोत. ही गर्दी ओसरली नाही तर ती बंद करण्याची वेळ येईल. महाराष्ट्र हा लढा लढणार आहे. अनेकदा रणांगणात उतरून लढाई करावी लागते. पण ही लढाई घरात बसून करायची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -