पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार

भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देहूरोड कँन्टोमेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नगरसेवक विशाल हे थोडक्यात बचावले आहेत. घटनेत जीव वाचवण्यासाठी दहावत असताना रस्त्यावर पडले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात दोघांचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. अद्याप हा हल्ला का करण्यात आला हे समजू शकलेले नाही.

रस्त्यावर पडल्याने किरकोळ जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; देहूरोड कँन्टोमेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक विशाल खंडेलवाल हे त्यांच्या देहूरोड बाजारपेठेतील कार्यालयाच्या बाहेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, ती सुदैवाने त्यांना न लागल्याने थोडक्यात बचावले. स्वतः चा जीव वाचवण्यासाठी ते धावत सुटले त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यात पडले आणि किरकोळ जखमी झाले. नगरसेवक विशाल खंडेलवाल या घटनेमुळे अत्यंत घाबरलेल्या स्थितीत आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत.


हेही वाचा – भिवंडी बारचालकावर गोळीबार प्रकरण ; आरोपी गजाआड

हेही वाचा – गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार; २ जण जखमी


 

First Published on: June 13, 2019 9:55 PM
Exit mobile version