घरमुंबईगोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार; २ जण जखमी

गोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार; २ जण जखमी

Subscribe

गोवंडी येथे आज सकाळी गोळीबार केल्याची झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ जण जखमी झाले असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अंधेरी साकीनाका परिसरात गोळीबार केल्याची खळबळजनक घटना ताजी असताना पुन्हा एकदा गोवंडी येथे आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ४ ते ५ अज्ञातानी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून देवनार पोलीस याचा तपास करीत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -